Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड

एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये जपानची नामांकित कंपनी फुकोकु इंडिया लि. (कोल्हापूर डिव्हिजन) यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड झाली.
या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील नोंदणी केलेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती कंपनीने घेतल्या. त्यापैकी २८ जणांची प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून निवड करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यांना वार्षिक २,५५,०००/- वेतनासह भविष्य निर्वाह निधी, भोजन व आरोग्य सुविधा कंपनीकडून दिल्या जातील. या २८ पैकी एनआयटीचे २३ विद्यार्थी आहेत. वाहन उद्योगांना वाहनातील विविध प्रणाली डिझाईन व तयार करून पुरवण्यात फुकोकु कंपनी आघाडीवर आहे.
एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी कंपनीचे एचआर अधिकारी अक्षय खोत यांचे स्वागत केले. खोत यांनी इंटरव्ह्यूच्या उत्तम आयोजनासाठी एनआयटीचे आभार मानले. यासाठी टिपीओ प्रा. किरण वळीवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. रजिस्ट्रार प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश कट्टी, प्रा. स्वप्निल पाटील, प्रा. गुरूप्रिया देसाई यावेळी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
61 %
2.6kmh
0 %
Wed
27 °
Thu
27 °
Fri
27 °
Sat
29 °
Sun
30 °

Most Popular

You cannot copy content of this page