Homeशैक्षणिक - उद्योग अमृतपेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

• जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेट
कोल्हापूर :
स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रदर्शनाला सदिच्छा भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.
या प्रदर्शनाचे उदघाटन ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष दीपक आंबर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ब्राह्मण सभा करवीरचे उपाध्यक्ष मधुसूदन धर्माधिकारी, कार्यवाहक श्रीकांत लिमये, संचालक श्री. चौगले, व्यवस्थापक अशोक जोशी व कर्मचारी, बीबीएफ ग्रुपचे अध्यक्ष राजन छत्रे, नगरसेविका दिपा अजित ठाणेकर तसेच जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे प्रदर्शन ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात एकूण १९ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये विशेषतः महिला उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले होते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने तसेच आकर्षक हस्तकला वस्तू थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळाली. स्थानिक उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
61 %
2.6kmh
0 %
Wed
27 °
Thu
27 °
Fri
27 °
Sat
29 °
Sun
30 °

Most Popular

You cannot copy content of this page