कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एफएमसीजी व्यवसायातील कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL)ने आपल्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड ‘कॅम्पा श्योर’साठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
कॅम्पा ब्रँडप्रमाणेच अमिताभ बच्चन हेही उत्कृष्टता, विश्वासार्हता आणि मूल्यांचे प्रतीक मानले जातात. देश-विदेशात त्यांचे कोट्यवधी चाहते असून ही भागीदारी ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास अधिक दृढ करेल.
RCPLने २०२२ मध्ये कॅम्पा कोलाचे अधिग्रहण केले आणि २०२३ मध्ये भारतीय बाजारात पुन्हा लाँच केले. त्यानंतर कॅम्पा एनर्जी ड्रिंक्स, रसिक बेव्हरेजेस, ज्यूस तसेच आता कॅम्पा श्योर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या माध्यमातून कंपनीने आपल्या पेय पोर्टफोलिओचा यशस्वी विस्तार केला आहे. कॅम्पा हा भारतीय सॉफ्ट ड्रिंक बाजारात एक मजबूत आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख निर्माण करत आहे.
RCPLचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केतन मोदी म्हणाले की, ज्या प्रकारे कॅम्पा हा एक विश्वासार्ह भारतीय ब्रँड आहे, त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन हेही प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यांची लोकप्रियता सीमांच्या पलीकडे आहे. विश्वास, शुद्धता आणि प्रामाणिकता ही दोघांचीही समान मूल्ये आहेत. अमिताभ बच्चन आणि कॅम्पा यांची ही भागीदारी समान विचारधारेचे प्रतिबिंब आहे. दोन दिग्गजांचा हा संगम अत्यंत खास आहे.
सुरक्षित आणि शुद्ध पेयजल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कॅम्पा श्योर अतिशय स्पर्धात्मक किंमतीत सादर करण्यात आले आहे. हे पाणी २५० मिली, ५०० मिली, १ लिटर, २ लिटर, ५ लिटर, १० लिटर आणि २० लिटर अशा विविध पॅक साइजमध्ये उपलब्ध असून प्रत्येक गरज आणि प्रत्येक प्रसंगासाठी उपयुक्त आहे. रिलायन्स आणि कॅम्पा यांच्या विश्वासार्ह वारशावर आधारित कॅम्पा श्योर पाणी १० हून अधिक शुद्धीकरण प्रक्रियांतून जाते आणि प्रत्येक थेंबात शुद्धता व गुणवत्तेची खात्री देते.

