Homeशैक्षणिक - उद्योग जरग विद्यामंदिरच्या उत्कर्ष प्रभुखानोलकरची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

जरग विद्यामंदिरच्या उत्कर्ष प्रभुखानोलकरची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

कोल्हापूर :
लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर कोल्हापूरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी उत्कर्ष राजाराम प्रभुखानोलकर याची कोल्हापूर महानगरपालिके मार्फत आयोजित इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी गुणवत्तेनुसार निवड झाली आहे.
सन-२०२४-२५ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्कर्षने राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे गुणवत्तेनुसार त्याची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिकेकडून निवड करण्यात आली आहे.
उत्कर्ष या अभ्यासासाठी मंगळवारी रवाना होणार असून या दौऱ्यात अंतराळ संशोधन, अंतराळयान, उपग्रह त्याचबरोबर इस्रो येथील शास्त्रज्ञांचे प्रत्यक्ष कार्य पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूर म.न.पा. राजर्षी शाहू शिष्यवृत्तीसाठीही त्याची यापूर्वी निवड झाली आहे.
या यशासाठी उत्कर्षला मनपा आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरण कुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले. त्याचबरोबर मुख्याध्यापक नीता ठोंबरे, सर्व शिक्षक व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5 ° C
24.5 °
24.5 °
52 %
4.8kmh
1 %
Sat
24 °
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °

Most Popular

You cannot copy content of this page