Homeकला - क्रीडाकरसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी-२० स्पर्धेत गुजरातला विजेतेपद

करसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी-२० स्पर्धेत गुजरातला विजेतेपद

कोल्हापूर :
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी-२०  क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत अविनाश सोनावणे (नाबाद ८२) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर गुजरात संघाने महाराष्ट्र संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
दरम्यान, तसेच सामनावीर अविनाश सोनावणे ठरला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज: सोमनाथ नलावडे (१३१ धावा),
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: राहुल पाटील (६ बळी),
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: मोहम्मद पटेल तर मालिकावीर: सोमनाथ नलावडे यांना गौरविण्यात आले.
सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने २० षटकात ६ बाद १३३ धावा केल्या. यात अश्विनकुमार शिंदे नाबाद ३८, मोहसीन शेख ३५, लखन तामचीकर १९ ,विनोद मुसळे १५, सोमनाथ नलावडे ११ यांनी धावा केल्या. गुजरात संघाकडून बरकत अली (१-३०), परशुराम देसले (१-२५), चिराग गांधी (१-१७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हे आव्हान गुजरात संघाने १५.४ षटकात २ बाद १३५ धावा करून पूर्ण केले. यात अविनाश सोनावणेने ४६ चेंडूत १२ चौकार व २ षटकारासह नाबाद ८२ धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला मोहम्मद पटेल १९, जहीर मेमन नाबाद ११ यांनी धावा काढून साथ दिली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू करसन घावरी, मुख्य प्रायोजक व उद्योजक अनिल जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीपक जाधव, नीता कदम, ब्रिजेश सोलकर,
प्रसाद देसाई, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे समन्वयक राहुल मगर, ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्डचे अध्यक्ष शरद सावंत, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे सचिव राजू मुजावर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5 ° C
24.5 °
24.5 °
52 %
4.8kmh
1 %
Sat
24 °
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °

Most Popular

You cannot copy content of this page