कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व भोसले कुटुंबीय पुरस्कृत कै. बाबा (विक्रमसिंह) भोसले ट्रॉफी टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी व शिवनेरी क्रिकेट क्लबने विजयी सलामी दिली.
राजाराम काॅलेज मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे यंदा ४०वे वर्ष आहे. स्पर्धेचे उदघाटन केडीसीएचे माजी संचालक व ज्येष्ठ सभासद अनिल पाटील यांच्या हस्ते व अमन शेख, केडीसीए उपाध्यक्ष अभिजीत भोसले, शैलेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेचे सचिव मदन शेळके, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णात धोत्रे, रमेश हजारे, केदार गयावळ, जनार्दन यादव, डाॅ. संजय पाठारे, किरण रावण, शौनक भिडे, दिवाकर पाटील, पंच अनिल सागांवकर, रहीम खान व खेळाडू उपस्थित होते.
प्रथम फलदांजी करताना शाहूपुरी जिमखानाने २० षटकांत ५ बाद २०१ धावा केल्या. यामध्ये शौर्य खोडवे ७३, अविनाश कांबळे ५१, कैफ जमादार ३२, अमर त्रिपाटी १५ धावा केल्या. रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीकडून क्षितीज पाटील, रोहन सावंत व चेतन नार्वेकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीने २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या. यामध्ये चेतन नार्वेकर ७७, वॄषभ लट्टे नाबाद ३१, करण वाघमोडे ३१, यतीराज पाटोळे १९, रोहन सावंत नाबद १३, वसीम मुल्लाणी ११ धावा केल्या. शाहूपूरी जिमखानाकडून शौर्य खोडवेने ३, आदित्य देवल व ज्ञानेश कवडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशाप्रकारे रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीने ५ गडी राखून विजय संपादन केला.
दुसरा सामना भिडे स्पोर्टस विरूध्द शिवनेरी क्रिकेट क्लब (अ) मध्ये झाला. या सामन्यात शिवनेरी क्रिकेट क्लबने ७ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना भिडे स्पोर्टसने १६.१ षटकांत सर्वबाद ९० धावा केल्या. यामध्ये मोहीत पाटील २४, वैभव पवार २१, धनराज सोनुले १५ धावा केल्या. शिवनेरी क्रिकेट क्लबकडून अनिकेत नलवडेने ४, हर्षजीत पाटीलने ३ प्रथमेश बाजारी व सोहम काटकर यांनी प्रत्येकी बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना शिवनेरी क्रिकेट क्लबने १०.५ षटकांत ३ बाद ९१ धावा केल्या. यामध्ये विवेक पाटील ४०, अनिकेत नलवडे नाबाद १५, आदित्य पाटील १३ धावा केल्या. भिडे स्पोर्टसकडून वर्जकुमार धुळा सावंतने २, मोहीत पाटीलने १ बळी घेतला. अशाप्रकारे शिवनेरी किक्रेट क्लब (अ) ने ७ गडी राखून विजय मिळवला.
रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी व शिवनेरी क्रिकेट क्लबची विजयी सलामी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

