कोल्हापूर :
व्हेव इंटरनॅशनल स्कूल, जमशेदपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ३९व्या राष्ट्रीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या दिव्या पाटीलने चमकदार कामगिरी करत अकरापैकी आठ गुण मिळवून चौथे स्थान पटकाविले. तिला रोख ४८ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
अंतिम अकराव्या फेरीत कर्नाटकच्या प्रतितीकडून पराभूत होऊनही दिव्याने सन्मानजनक चौथे स्थान मिळविले.
सुरुवातीच्या दोन फेऱ्या जिंकल्यानंतर दिव्याला तिसऱ्या फेरीत तमिळनाडूच्या निवेदिताकडून हार मानावी लागली होती.चौथ्या पाचव्या फेरीत पुन्हा विजय होत दिव्याने आघाडी घेतली व सहाव्या फेरीत महाराष्ट्राच्या अनुष्का कुतवल बरोबर बरोबरी साधली. त्यानंतर सातव्या फेरीत आक्रमक खेळ करत दिव्याने अग्रमानांकित फिडे मास्टर उत्तराखंडच्या शेरली पटनाईकला पराभवाची धूळ चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठव्या फेरीत तेलंगणाच्या नरहरी गीथिका व नवव्या फेरीत आंध्रप्रदेशच्या सव्याश्रीचा पराभव करून दिव्याने आघाडी घेतली. दहाव्या फेरीत पहिल्या पटावर खेळताना द्वितीय मानांकित व या स्पर्धेतील विजेते शुभी गुप्ताला बरोबरीत रोखले. परंतु अंतिम अकराव्या फेरीत सहावी मानांकित कर्नाटकची प्रतिती बोर्डोलोईकडून दिव्याचा पराभव झाल्यामुळे दिव्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दिव्याची जुळी बहीण दिशा पाटीलचे स्पर्धेत साठावे मानांकन होते. तिला अंतिम अकरावी फेरीनंतर सात गुणासह २५वे स्थान मिळाले. दिव्याचे या स्पर्धेमध्ये १५३.६ आंतरराष्ट्रीय गुणाची वाढ झाली आहे तर दिशाचे ७७ गुण वाढले आहेत.
दिव्या व दिशा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मेडियम ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहेत. कॉलेजच्या प्राचार्या सौ. स्मिता पाटील व क्रीडा शिक्षक राहुल सरडे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, दिव्याचे आई-वडील कविता व शरद पाटील
कोल्हापूरची दिव्या पाटील राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्यास्थानी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.3
°
C
25.3
°
25.3
°
56 %
6.7kmh
0 %
Sun
25
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

