कोल्हापूर :
प्रभाग क्रमांक ११ मधून ओबीसी महिला प्रवर्गसाठी सौ. गीता गणेश चिले यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली आहे. त्यानुसार गणेश चिले आणि त्यांच्या पत्नी सौ. गीता चिले यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागात त्यांचा ‘घर टू घर’ प्रचार सुरू असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते व भाजपा मंगळवार पेठ मंडल सरचिटणीस गणेश महादेव चिले हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून ओबीसी महिला प्रवर्गसाठी सौ. गीता गणेश चिले यांच्या उमेदवारीसाठी भाजपाकडे मागणी अर्ज केलेला आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२०) सौ. गीता चिले यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात झाला.
मंगळवार पेठेतील जासूद गल्ली येथील महादेव मंदिर येथे नारळ फोडून प्रचार शुभारंभ झाला. त्यानंतर प्रभागातील महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांबरोबर गणेश चिले व सौ. गीता चिले यांनी प्रभागातून पायी प्रचार रॅलीव्दारे नागरिकांची भेट घेऊन माहिती पत्रक देत आपले कार्य व उमेदवारी संदर्भाने संवाद साधला.
सौ. गीता चिले व गणेश चिले यांनी प्रभागात घर टू घर प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली कामे आणि सामाजिक कार्य यामुळे त्यांचा यापूर्वी परिसरातील नागरिकांशी परिचय आहे. त्यामुळे ते प्रभागातील ‘घर टू घर’ जाऊन आपली उमेदवारी का आणि कशासाठी आहे, हे पटवून देत आहेत. यामुळे त्यांना प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सौ. गीता चिले व गणेश चिले यांनी आतापर्यंत प्रभागातील शाहू बँक चौक, नंगिवली तालीम मंडळ परिसर, बजापराव माने तालीम मंडळ, पोवार गल्ली, कॅसेट ग्रुप, कराळे बोळ, शिंदे गल्ली, बिनधास्त तरुण मंडळ सिद्धाळा गार्डनची मागिल बाजू, डाकवे गल्ली, कोण्णूर गल्ली, जरग गल्ली, राम गल्ली, माने गल्ली, प्रॅक्टिस क्लब परिसर, मंडलिक गल्ली, माळी चेंबर्स प्रॅक्टिस क्लब चौक व मेन रोड, लाड चौक, हिंद तरुण मंडळ, काळकाई गल्ली, नाथागोळे तालीम परिसर, हैदर अली रोड, वारे वसाहत, संभाजीनगर, मगरमठी गल्ली, टिंबर मार्केट परिसर, ओंकार तरुण मंडळ परिसर अशा ठिकाणी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
——————————
सौ. गीता गणेश चिले यांचा घर टू घर प्रचार
Mumbai
clear sky
24.5
°
C
24.5
°
24.5
°
52 %
4.8kmh
1 %
Sat
24
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

