कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट सई जाधव यांचा सत्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.
लेफ्टनंट सई जाधव यांनी टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) मध्ये नियुक्त होताना ‘आयएमए’मधून पास होणाऱ्या पहिल्या महिला लेफ्टनंट बनण्याचा मान मिळवून इतिहास घडवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी यशाबद्दल विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ एस. पी. थोरात, परीक्षा विभागप्रमुख डॉ. जी. जे. नवाथे, लेफ्टनंट जितेंद्र भरगोंडा, आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी, मेजर सुनिता भोसले, प्रबंधक सचिन धनवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. गीतांजली साळुंखे, प्राध्यापक, मेजर संदीप जाधव परिवार, एनसीसी छात्र, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
——————————
विवेकानंदमध्ये लेफ्टनंट सई जाधव यांचा सत्कार
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

