Homeकला - क्रीडावेताळमाळने खंडोबाला रोखले

वेताळमाळने खंडोबाला रोखले

प्रॅक्टीस क्लबची झुंजार क्लबवर मात
कोल्हापूर :
छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने खंडोबा तालीम मंडळला १-१ गोलने बरोबरीत रोखले. सलग तीन सामने जिंकत ‘खंडोबा’ने विजयी घोडदौड सुरू ठेवली होती पण सामना बरोबरीत राहिल्याने ही घोडदौड थांबली. सामन्यातील दोन्ही संघाचे गोल पेनल्टीवर झाले. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. चौथ्या फेरीत ‘खंडोबा’चे एकूण १० गुण तर वेताळमाळचे दोन गुण झाले आहेत. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने टायब्रेकरवर झुंजार क्लबवर ४ विरूध्द २ गोलने मात केली. पूर्णवेळेत सामना १-१ बरोबरीत होता.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत खंडोबा आणि वेताळमाळ संघातील सामना चुरशीचा झाला. पहिल्या गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. पहिल्या अर्ध्या तासात गोलफलक कोराच होता. खंडोबाकडून झालेल्या चढाईत विष्णू टी.एम.ला वेताळमाळच्या रेहान मुजावरने गोलक्षेत्रात अवैधरित्या रोखल्याने मुख्यपंच प्रदीप साळोखे यांनी पेनल्टी किक दिली. त्यावर शाहीर सिद्दीकने अचूक गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. ३०व्या मिनिटाला मिळालेली १-० ची आघाडी फारवेळ टिकली नाही. वेताळमाळकडून झालेल्या खोलवर चढाईत खंडोबाच्या ऋतुराज संकपाळने गोलक्षेत्रात संदेश कासारला नियमबाह्य पद्धतीने रोखले. त्यामुळे मुख्यपंचानी पेनल्टी दिली. त्यावर मिताईने अचूक गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ३९व्या मिनिटाला सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी खंडोबाकडून विष्णू टी.एम., शाहीर सिद्दीक, रोहित जाधव, स्टॅलिन, अवधूत पाटोळे यांनी वेगवान खेळ करत गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या पण गोलची आघाडी वाढवू शकले नाहीत. वेताळमाळच्या सर्वेश वाडकर, आकाश माळी, मिताई, शोएब बागवान, आकाश मोरे यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही. अखेर पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
प्रॅक्टीसची झुंजार क्लबवर मात…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात झुंजार क्लब आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना निर्धारित वेळेत १-१ गोल बरोबरीत राहिला. पूर्वार्धात प्रॅक्टीस क्लबच्या सचिन गायकवाडने ३५व्या मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्या गोलची परतफेड उत्तरार्धात झाली. झुंजार क्लबच्या शुभम पाटीलने ६७व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये प्रॅक्टीस क्लबच्या आकाश बावकर, सचिन गायकवाड,ओम पोवार, शुभम बेडेकर यांनी अचूक गोल केले. झुंजार क्लबकडून निखिल डकरे, संदेश शिंदे यांना गोल करण्यात यश आले. तर शुभम पाटील आणि समर्थ नवाळे गोल करू शकले नाहीत. अशाप्रकारे प्रॅक्टीस क्लबने ४ विरूध्द २ गोलफरकाने सामना जिंकला.
——————————————————-
      आजचे सामने…
• फुलेवाडी – सुभाषनगर : दु.१:३० वा.
• शिवाजी – बालगोपाल : दु‌. ४ वाजता
——————————————————-
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
31.9 °
22 %
3.6kmh
16 %
Tue
32 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
26 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page