कोल्हापूर :
कोल्हापूर खो खो असोसिएशन अंतर्गत विवेकानंद कॉलेज यांच्या सहकार्याने रविवारी राज्य पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून विद्यार्थी खेळाडू, शिक्षक, संघटक व प्रशिक्षक सहभागी झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त असल्याने राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे खेळाडू तसेच पंच स्वतंत्ररित्या सहभागी होतात असे मार्गदर्शन उदघाटनप्रसंगी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य संभाजीराव मांगोरे पाटील यांनी केले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक शांतिलाल मुसळे यांनी कोल्हापूर असोसिएशनचा इतिहास सर्वांना सांगितला.
कोल्हापूरला असणारी क्रीडाक्षेत्राची परंपरा, खेळाडूंसाठी विवेकानंद कॉलेजचे असणारे योगदान तसेच कॉलेजने राबवलेली स्पोर्ट्स पॉलिसी याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी मार्गदर्शन केले. या परीक्षेसाठी राष्ट्रीय पंच प्रमोद मकोटे उपस्थित होते.
या नियोजनासाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, तसेच जॉइंट सेक्रेटरी अमोल लंगोटे यांनी फोनवरून सर्वांना शुभेच्या दिल्या. परीक्षेच्या सुरवातीस सर्व परीक्षार्थ्यांना खो खो विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यात खो खो खेळाची नियमावलीबाबत कोल्हापूर खो खो असोसिएशन पंच मंडळाचे कन्व्हिनियर संभाजी बंडगर, गुणपत्रक बाबत प्रा. अमित कुंडले, क्रीडांगण बाबत प्रा. अमित कागले, तर पंचांची कर्तव्ये विशाल माळी, खो खो खेळातील असणाऱ्या पंचांच्या सांकेतिक खुणा याबाबत दत्तात्रय सरवदे, आणि प्रात्यक्षिक बाबत राहुल चौगुले यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर परीक्षेस प्रारंभ झाला. सर्वप्रथम लेखी परीक्षा, मुलाखती व प्रात्यक्षिके घेण्यात आली व ही राज्य पंच परीक्षा उत्साहात पार पडली.
या परीक्षा नियोजनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले व भीमराव भांदीगरे यांच्यासह खेळाडूंचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये कोल्हापूर खो खो असोसिएशन राज्य पंच परीक्षा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
50 %
2.1kmh
0 %
Mon
26
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°

