कोल्हापूर :
महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या वतीने ठाणे ईस्ट येथे दुसऱ्या लीप जिम्नॅस्टिक स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेसाठी संघ निवड व जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या जिम्नॅस्टिक हॉलमध्ये पार पडल्या.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध भागातील सराव केंद्र सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या गटामध्ये ८५ पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा नॅशनल ४, ५, ६ व ७ या प्रकारात झाल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक के. जी. जाधव, संघटनेचे सचिव संजय तोरस्कर उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून सौ. पूनम शिंदे, ओंकार माने, मंदार चारापले, तेजस्विनी वेटाळे, स्वरूपा सुर्वे, प्रणिती पंडितराव, स्वरा पाटील, श्रेया काटवे, परिणीता सरूडकर व विशाल पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल सविस्तर पुढीलप्रमाणे-
• नॅशनल ४ इन एज मुले :
प्रथम- अंश योगेश जंगम, द्वितीय- देवराज पद्मसिंह सूर्यवंशी, तृतीय- श्रीयांश संग्राम पाटील.
• नॅशनल ४ ओव्हर एज मुले :
प्रथम- संचित राजू मोरबाळे, द्वितीय- रणवीर अभिजीत मनगुते, तृतीय- कलश शैलेश शिंदे, चतुर्थ- आर्यन संजय धनके, पाचवा- यशराज नटराज संकपाळ, सहावा- धनराज रतन संकपाळ.
• नॅशनल ५ ओव्हर एज मुले :
प्रथम- अवनीश अवधूत पवार, द्वितीय- राजवीर दत्तात्रय बुजरे, तृतीय-जयराज गणेश निर्वाणी, चतुर्थ- आदित्य अनिल परीट, पाचवा- रणवीर राहुल सुतार, सहावा- विराट संदीप राऊत.
• नॅशनल ६ ओव्हर एज मुले :
प्रथम- मयुरेश उत्तम माने.
• नॅशनल ५ ओव्हर एज मुली :
प्रथम- अनया अभिनंदन शेटे, द्वितीय- आराध्या अमित नलावडे, तृतीय- वैष्णवी संतोष दामूगडे, चतुर्थ- हर्षदा निवास पाटील,
पाचवा- रिद्धी रुपेश ढेरे, सहावा- कादंबरी जाधव.
• नॅशनल ६ ओव्हर एज मुली :
प्रथम- आर्वी प्रताप पारकर.
• नॅशनल ४ ओव्हर एज मुली :
प्रथम- प्रांजल प्रतीक मोहिते, द्वितीय- पूर्वी रोहित भडाळे, तृतीय-कादंबरी संतोष माने, चतुर्थ- ईरा शितल दुर्गुळे, पाचवा- स्वरा सचिन सागावकर, सहावा- गिरिजा सोमनाथ सुतार.
• नॅशनल ४ इन एज मुली :
प्रथम- जानवी युवराज शिंदे, द्वितीय- जीविका अनिल सातपुते, तृतीय- ओवी अभिनंदन शेटे, चतुर्थ- विना प्रसाद ठाकूर, पाचवा- ओमवी वीरेंद्र पोळ, सहावा-वैभवी प्रवीण आळवेकर.
——————————————————-
जिम्नॅस्टिक संघ निवड व जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

