Homeकला - क्रीडाकुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १६ देशांतील खेळाडू झुंजणार

कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १६ देशांतील खेळाडू झुंजणार

कोल्हापूर :
डेक्कन जिमखाना आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड ३ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १६ देशांतील अव्वल कुमार खेळाडू सहभागी झाले आहे. यामध्ये मुलांच्या गटात भारताच्या अर्णव पापरकर याला तर मुलींच्या गटात कझाकस्तानच्या अल्बिना काकेनोवा यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने म्हणाले की, यावर्षी या स्पर्धेत १६ देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच, घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. स्पर्धेतील एकेरीतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्या खेळाडूला एमव्ही देव स्मृती करंडक आणि १०० आयटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूला ६० आयटीएफ गुण देण्यात येणार आहेत. दुहेरीतील विजेत्यांना ७५ आयटीएफ गुण, तर उपविजेत्या ४५ आयटीएफ गुण देण्यात येणा आहेत. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंना २०२६ मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलीयन ओपन ज्युनियर स्पर्धेत अधिक गुण मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल.
यावेळी गद्रे मरीनचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे व गद्रे मरिन्स्‌ एक्स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम उपस्थित होते.
लीना नागेशकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना दि. १ डिसेंबरला सुरूवात होणार असून पात्रता फेरीचे सामने २९ व ३० नोव्हेंबरला होणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेत मुलींच्या गटात भारताच्या रिशीका रेड्डी बासिरेड्डी हिने तर, मुलांच्या गटात फ्रांसच्या एरॉन गॅबोट याने विजेतेपद संपादन केले होते.
         —————–
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी…
• मुले: १. अर्णव पापरकर (९६, भारत), २. काई थॉम्पसन (१२८, हॉंगकॉग), ३. समर्थ साहित्य (१७५, भारत), ४. आराध्य क्षितिज (३४४, भारत), ५. आश्रव्य मेहरा (३५०, भारत), ६. केंसुके कोबायास(३७९, जपान), ७. प्रतीक नवीन (४६१, ऑस्ट्रेलिया), ८. व्रज गोहिल (५००, भारत).
• मुली: १. अल्बिना काकेनोवा (२०५, कझाकस्तान), २. दिया रमेश (२२६, भारत), ३. ऐश्वर्या जाधव (२८०, भारत), ४. सतिमा तोरेगेन (३२१, कझाकस्तान), ५. केसेनिया अखरामीवा (३२३, रशिया), ६. दिनारा डी सिल्वा (४५०, श्रीलंका), ७. एंजल वारंग (५०९, ऑस्ट्रेलिया), ८. स्निग्धा कांता (५५०, भारत).
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
65 %
2.6kmh
0 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page