कोल्हापूर :
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्या प्रेरणेने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावावा व अनेक उद्योजक तयार व्हावेत अशी अपेक्षा होती. आज त्याचप्रकारे ही संस्था विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी देऊन स्वयंपूर्ण बनवित आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब आहे, असे विचार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मांडले.
ते जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व दे आसरा फाउंडेशन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित उद्योजक मेळाव्यात संस्था प्रतिनिधी म्हणून बोलत होते.
प्रास्ताविक जिल्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अजय पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी उमेश पाटील, श्रीमती स्नेहा ननावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात अनिल वाडीकर यांनी व्यवसायाची निवड कशी करावी, व्यवसायासाठी व्यवस्थापकीय कौशल्य कसे विकसित करावे याबाबत माहिती दिली. कोल्हापूरातील प्रसिध्द उद्योजक महेश तोरगळकर यांची मुलाखत झाली. त्यानंतर युवा उद्योजकानी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे प्रमुख पाहुण्यांनी दिली. आभार अमोल जाधव यांनी मानले.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, प्रा. सनी काळे, डॉ. उमेश दबडे, प्रा. डॉ. अमोल मोहिते, प्रा. आर. आर. माने, प्रा. पानसरे तसेच प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
——————————————————-
व्यावसायिक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे : प्राचार्य अभयकुमार साळुंखे
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
14 %
4.1kmh
0 %
Sat
30
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

