• नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिला कर्मचाऱ्यांशी साधला विशेष संवाद
कोल्हापूर :
‘विजेसारख्या तांत्रिक क्षेत्रात आज महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. निसर्गाने दिलेल्या संवेदनशीलता व कल्पकता या गुणांचा वापर महावितरणच्या महिला अधिकारी-कर्मचारी प्रशासनात व ग्राहक सेवेत प्रभावीपणे करतात. त्यामुळेच महावितरणमध्ये महिला अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी काढले.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी कोल्हापूर परिमंडलातील ‘विद्युत भवन’ येथे महिला कर्मचाऱ्यांशी विशेष संवाद (दि.१९रोजी) साधला. यावेळी कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, निलेश चालिकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील व महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक राजेंद्र पवार पुढे म्हणाले की, महावितरणचे भविष्य आपल्या कामावर अवलंबून असून आपण सर्वजण ग्राहकांना चांगली सेवा देता. म्हणुनच महावितरणचे भविष्य आश्वासक आहे. महावितरणच्या यशात फिल्डवरील विद्युत सहायक ते मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी या सर्वांचे योगदान आहे. म्हणूनच ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनांमध्ये महावितरण प्रथम क्रमांकावर आले आहे. आज कुटुंब व कार्यालय यादोन्ही पातळींवर संतुलन साधने आव्हानात्मक असून याकरता सर्वानीच स्त्रीशक्तीचा सन्मान केला पाहिजे.
यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांप्रती महावितरण प्रशासन नेहमीच आपल्या पाठीशी असेल असेल असे राजेंद्र पवार यांनी आश्वस्त केले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
महावितरणमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : राजेंद्र पवार
Mumbai
smoke
27
°
C
27
°
24.9
°
28 %
2.6kmh
3 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

