कोल्हापूर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
सोलापूर येथील वडाळा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकत्याच आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या १० जिल्ह्यांमधील २५ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांकासाठी डॉ. डी. वाय. पाटील तळसंदे व कृषी महाविद्यालय नाशिक यांच्यात सामना झाला. डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुल संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा सामना १६ विरुद्ध २१ गुणांनी जिंकला.
डी. वाय. पाटील संघाकडून कर्णधार प्रसाद दरेकर, नवाज पठाण, दिनेश पालवी, आदित्य चव्हाण, अविष्कार कोगनोळे, सुरज कुटे, अजित गोरे, स्वप्निल कासार, प्रथमेश लोहार, प्रसाद बोबडे, सुमित गावडे या खेळाडूंचा सहभाग होता. त्यांना शारीरिक शिक्षण विभागचे प्रा. ए. एस. बंद्रे, अजिंक्य मोहिते, शुभम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज. पी. डी. उके, आर. आर. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-