Homeसामाजिकसंजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव

संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव

कोल्हापूर :
समाज सेवा हे एक व्रत आहे, असे मानून जैन व इतर समाजाची मनोभावे सेवा केल्याबद्दल मुंबई येथे नुकताच संजय घोडावत यांचा आचार्य श्री  दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री अविघ्न इस्टेट, श्री मुनीसुुव्रतस्वामी श्वे. मू. पू.जैन संघ व चातुर्मास व्यवस्था कमिटी यांच्याद्वारे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
संजय घोडावत यांनी कोल्हापूर आणि परिसरात राहून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मिठापासून ते विमानापर्यंत विविध क्षेत्रात उद्योगांची उभारणी केलेली आहे. तसेच संजय घोडावत शिक्षण संकुलाची स्थापना केली आहे. सोशल फाउंडेशनद्वारे सामाजिक कार्यात घोडावत ग्रुप नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदानातून जीवदान दिले आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी फाउंडेशनद्वारे कन्या महाविद्यालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी ३ लाखांच्यावर फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी  भूस्खलनग्रस्तांना फाउंडेशनच्यावतीने ११ लाखांची मदतही करण्यात आली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
27 ° C
27 °
27 °
89 %
2.1kmh
75 %
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page