• भाजपा उत्तरेश्वर मंडलची मागणी
कोल्हापूर :
येथील शुक्रवार पेठेत असलेले पंचांगंगा हॉस्पिटल हे ग्रामीण व शहरामधील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यवर्धिनी ठरत होते. पण गेल्या काही वर्षांपासून येथील अनागोंदी कारभारामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. तेव्हा पंचगंगा हॉस्पिटलच्या गंभीर समस्या सोडवाव्यात, अशी मागणी भाजपा उत्तरेश्वर मंडलने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा, पंचगंगा हॉस्पिटल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
महापालिका प्रशासनाला निवेदन देताना भाजपाचे सुनील पाटील, दीपक काटकर, सुशांत पाटील, अमेय भालकर, राहुल घाटगे, दिग्विजय कालेकर, सुनिता सूर्यवंशी, सचिन मुधाळे, गुरुनाथ कावडे, सचिन बिरंजे, महेश ओतारी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हॉस्पिटलच्या दुरुस्तीसाठी शासकीय फंडातून किंवा डीपीडीसी, स्वनिधी फंडातून भरीव निधीची तरतूद करावी. तसेच शासनाने मंजूर केल्यानुसार कम्युनिटी हेल्थ सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी भाजपा उत्तरेश्वर मंडलने केली आहे.
याबाबत, भाजपा उत्तरेश्वर मंडलचे अध्यक्ष सुनील पाटीलम्हणाले की, पूर्वी येथे स्वतंत्र प्राथमिक उपचार केंद्र होते. तेथे डॉक्टर रूम, कंपाउंडर रूम व स्वतंत्र ड्रेसिंग होती सध्या तेथे फक्त एकाच रूममध्ये गोळ्या औषधे देण्याचे काम सुरु आहे. एक इमर्जन्सी जरी पेशंट आला तर तिथे तो घेतला जात नाही. उडवाउडवीची उत्तरं देऊन पेशंटला सीपीआर रुग्णालयात पाठवा किंवा खाजगी दवाखान्यात पाठवा असे सांगितले जाते.
सुशांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला तर येथील डॉक्टर त्याला घरी तपासाला जात नाहीत व मृत्यू दाखले देत नाहीत. एखादी गर्भवती पेशंट आली तर तिला न तपासताच खासगी हॉस्पिटलला पाठवले जाते. रात्रीच्यावेळी सिजर ऑपरेशन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, त्यासाठी ठोस उपाययोजना करावी. या सर्व मागण्या सात दिवसांच्या आत पूर्ण कराव्यात याव्यात.
——————————————————-
पंचगंगा हॉस्पिटलच्या गंभीर समस्या सोडवाव्यात
Mumbai
mist
26
°
C
26
°
25.9
°
89 %
1.5kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°