कोल्हापूर :
महिला खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आर्थिक कणा आहेत. त्यांची आर्थिक शिस्त उल्लेखनीय आहे. त्यांच्या या आर्थिक शिस्तीमुळेच कुटुंबाची सर्वांगीण उन्नती होते, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.
महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावीम व नवतेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथील १६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
या सभेला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनातर्फे अनेक विविध योजना राबविण्यात येतात त्याचाही लाभ महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा. स्त्रियांची केवळ आर्थिक उन्नतीच नाही तर सर्वांगीण प्रगती व्हायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महिला बचत गटांसाठी सुमारे ५३ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून येत्या २ महिन्यात सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून महिला बचत गटामार्फत ‘कोल्हापूर चप्पल बांधणी’ प्रकल्प उभा करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते, दत्त / ओम साई महिला बचत गट, उद्योजिका शिवानी पाटील तसेच इयत्ता दहावीत ९६ टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी समीक्षा पाटील त्याचबरोबर सांगरूळ येथील कोल्हापूर चप्पल निर्माण करणाऱ्या महिला बचत गटाचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विजयकुमार चौगुले, संस्थाध्यक्ष दिपाली कांबळे, डॉ. योगेश साळे, सिद्धाराम मासाळे, सुनील बगाडे, श्री. प्रधान, श्रीमती गुरव यांच्यासह माविम व सीएमआरसीचे इतर अधिकारी – कर्मचारी आणि महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
महिलांची आर्थिक शिस्त उल्लेखनीय : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Mumbai
mist
26
°
C
26
°
25.9
°
89 %
1.5kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°