Homeसामाजिकदिव्यांगांना सर्वोतोपरी सहाय्य करणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दिव्यांगांना सर्वोतोपरी सहाय्य करणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर :
देशातील दिव्यांगाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने अंदाजित ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉल, स्वामी विवेकानंद कॉलेज या ठिकाणी केंद्र (भारत) सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगासाठीच्या मोफत सहाय्यक उपकरण वाटपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार शाहू छत्रपती, खा. धनंजय महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. )कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, उत्तम कांबळे,शहाजी कांबळे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, १९०२साली राजर्षी शाहू महाराजांनी विविध समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. ही घटना क्रांतिकारक होती. केंद्र सरकारची वाटचाल ही त्याच दिशेने आहे. दिव्यांगासाठी केंद्र सरकारने सरकारी नोकरीमध्ये चार टक्के आरक्षण ठेवले आहे. पूर्वी ७ निकषानुसार दिव्यांगाची व्याख्या ठरवली जायची. सन २०११ च्या जनगणनेनुसार २ कोटी ६८ लाख इतकी दिव्यांगांची नोंद झाली. तथापि सध्याच्या सरकारने २१ निकषानुसार (क्रायटेरियाद्वारे ) दिव्यांग शब्दाची व्याख्या ठरवली असल्याने यामध्ये भविष्यात वाढ झालेली दिसेल असा अंदाज व्यक्त केला. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे ते म्हणाले.
खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, आज दिव्यांग दिवस आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांच्याकडे विशेष व्यक्ती म्हणून न पाहता, सामान्य माणूस म्हणून पहावे असे आवाहन केले. तर खा. महाडिक म्हणाले, पॅरा ऑलम्पिकमध्ये दिव्यांग क्रीडापटूंनी भरीव कार्य करत देशासाठी पदके मिळवली आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडापटूंना केंद्राने अधिकाधिक मदत करावी.
जिल्ह्यातील सुमारे ४०७४ दिव्यांगाना निकषानुसार पात्र ठरविण्यात आले असून सुमारे २ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले आहे.
आजच्या या कार्यक्रमासाठी मनपा क्षेत्रातील २३८ दिव्यांगांना महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चार विभागीय कार्यालयामार्फत केएमटी बसची विशेष मोफत बससेवा दिव्यांगांना कार्यक्रम स्थळी ने – आण करण्यासाठी करण्यात आली होती. तसेच दिव्यांगासाठी चहा, नाश्ता व जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद व मनपा तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून इलेक्ट्रिक स्वरूपाची तीन चाकी सायकल, व्हीलचेअर तसेच साध्या तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आभार मानले. या प्रसंगी कपिल जगताप सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी तसेच दिव्यांगांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
26 ° C
26 °
25.9 °
89 %
1.5kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page