Homeशैक्षणिक - उद्योग गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यावर भर : प्रा. डी. एन. शेलार

गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यावर भर : प्रा. डी. एन. शेलार

• डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
  कोल्हापूर :
मानवी जीवनामध्ये कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असून या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. भविष्यात कृषी संशोधन क्षेत्रात अमाप संधी निर्माण होणार आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच  सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर  असल्याचे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन.  शेलार यांनी केले. महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
अकॅडमिक इन्चार्ज आर. आर. पाटील यांनी, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, विविध विभाग व सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयाला मिळालेले विविध पुरस्कार व उल्लेखनीय कामगिरीचा आढावा मांडला.
महाविद्यालयातील प्राध्यापकांचा शैक्षणिक व संशोधनातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडाक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या न्युज लेटरच्या दहाव्या आवृत्तीचे यावेळी अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धैर्यशील काजळे व माधुरी धनगर तर प्रा. एम. एन. केंगरे यांनी यांनी आभार मानले. यावेळी हेड फार्म ऑपरेशन्स इंजि. ए. बी. गाताडे, डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. के. एस. शिंदे यांच्यासह प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
69 %
1.2kmh
8 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °

Most Popular

You cannot copy content of this page