कोल्हापूर :
पुण्यातील सर्वात जुन्या व नामवंत पूना क्लब गोल्फ कोर्सच्यावतीने व्यावसायिक व हौशी गोल्फपटूंसह प्रत्यक्ष मैदानावर त्यांना बहुमोल सूचना करून त्यांच्या यशाला हातभार लावणाऱ्या कॅडीजचाही सन्मान करण्यात आला.
क्लबचे गोल्फ कॅप्टन जय शिर्के यांनी यावेळी सांगितले की, पुरुष, महिला व हौशी स्पर्धा मालिकांमध्ये पूना क्लबच्या खेळाडूंनी मिळवलेले दैदिप्यमान यश हे क्लबच्या गुणवत्तेचे निदर्शक आहेत.
यावेळी क्लबच्या खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांची अधिकृत यादी पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक यांनी जाहीर केली. या यादीतील व्यावसायिक गटात प्रामुख्याने उद्यान माने, रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर, दिव्यांश दुबे, अनन्या गर्ग, मन्नत ब्रार, गुरकी शेरगील यांचा समावेश आहे. पूना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले यांनी या खेळाडूंचा गौरव केला.
पूना क्लबच्या महिला गोल्फ कॅप्टन पद्मजा शिर्के म्हणाल्या की, अनन्या गर्ग आणि मन्नत ब्रार यांच्यासारख्या गुणवान युवा खेळाडूंच्या उदयामुळे क्लबच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही निश्चिन्त झालो आहोत. त्यांना त्यांच्या क्रीडा प्रवासात सर्वोतोपरी पाठिंबा देताना आम्हांला अभिमान व आनंद वाटत आहे. यावेळी गोल्फ विकास समिती आणि कॅडी वेलफेअर समितीचे सल्लागार इक्रम खान, शशांक हळबे, आदित्य कानिटकर, मनिष मेहता आणि तुषार आसवानी आदी उपस्थित होते.
पूना क्लबचे गुणवान व्यावसायिक गोल्फपटू असे : उदयन माने, रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर, दिव्यांश दुबे, अनन्या गर्ग, आदित्य भांडारकर, व्यावसायिक कॅडी खेळाडू : प्रवीण पाठारे, समीर शेख व अक्षय दामले.
हौशी खेळाडू : आदित्य गर्ग, आकाश नाखरे, अमन ओसवाल, आर्किन पाटील, अवनीश सोमय्याजी, जिया कर्दभाजणे, विदिश कर्दभाजणे आणि विहान गजूला.
ज्युनियर गट : अभिराम महाजन, आदित्य पवार, अनिका कानिटकर, आर्यन ठाकूर, मिहीर कदम, रेहान पोंचा, स्वामिनी कुलकर्णी, वन्या सिंग, विवान कुदळे, रियान पोरवाल, आयरा मिश्रा, सुब्रमण्यम, आशिमा चाचारा, रुहान गुलाटी, आदोर दास, मोहनीश मेलवानी, सुमेध गांगल, अभी भूपतानी, विमल देव, शुभंकर शर्मा.
प्रशिक्षक : आदित्य कानिटकर, राजीव दातार, गुरकी शेरगील. कॅडी : रमेश चाबूस्वार, आशिष जाधव, संतोष साठे व प्रवीण सिंग.
——————————————————-
व्यावसायिक, हौशी व कुमार गोल्फपटूंसह कॅडीजचाही सन्मान
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
26.9
°
51 %
3.6kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

