कोल्हापूर :
कोल्हापूर महिला संघाने सांगली चॅम्प्स महिला संघावर ९ धावांनी विजय मिळवत सांगली प्रिमियर महिला स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कै. रामचंद्र मालु क्रिकेट मैदान सांगली येथे झालेल्या सांगली महिला प्रिमियर टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना कोल्हापूर महिला संघ विरूध्द सांगली महिला चॅम्प्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यात कोल्हापूर महिला संघाने ९ धावांनी विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
प्रथम फलदांजी करताना कोल्हापूर महिला संघाने २० षटकांत ४ बाद ९८ धावा केल्या. यामध्ये मिसबा सय्यद ४८, सुदिक्षा देसाई १७, सई यवलसुस्कर १४ धावा केल्या. सांगली चँम्प्स महिलाकडून अर्पिता नायकवडीने २ व ऋषी ठक्करने १ बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना सांगली चँम्प्स महिला संघाने २० षटकांत ७ बाद ८९ धावा केल्या. यामध्ये ऋषी ठक्कर २६, भावी पुनिमा २३, संस्कतती राठोड १३ व श्रेया जेवुर नाबाद १० धावा केल्या. कोल्हापूर महिला संघाकडून सेजल सुतार व सुदिक्षा देसाई यांनी प्रत्येकी २ तर संजना वाघमोडे व अक्षता नरतवडेकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशाप्रकारे कोल्हापूर महिला संघाने ९ धावानी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विजयी महिला संघ….
अंकिता भारती (कर्णधार), अक्षता नरतवडेकर, पवित्रा महाडीक, ईश्वरी राणे, मिसबा सय्यद, सई यवलुस्कर, सुदिक्षा देसाई, साक्षी पोतदार, संजना वाधमोडे, सेजल सुतार, स्वरा जाधव, तनिष्का माळी, रितु जमादार तर संघ व्यवस्थापक मुद्दस्सर मुल्ला.
सांगली महिला प्रिमियर टी-२० स्पर्धेत कोल्हापूर महिला संघ विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
69 %
1.2kmh
8 %
Tue
27
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°