कोल्हापूर :
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज बाकी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकान्वये सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
१ डिसेंबर २०२५ पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
——————————————————-
HSRP बसविण्यासाठी मुदतवाढ
Mumbai
haze
29
°
C
29
°
29
°
70 %
3.1kmh
40 %
Thu
32
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
28
°

