कोल्हापूर :
सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात ग्रामीण जीवनाला रानभाज्यांचे महत्त्व कळावे यासाठी राधानगरी येथील रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट व सौभाग्य अलंकार यांच्यावतीने रानभाजी स्पर्धा (महोत्सव) उत्साहात पार पडला. यामध्ये दिपाली वंजारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
दरम्यान, स्पर्धेत प्रथम क्रमांक- दिपाली वंजारे, द्वितीय क्रमांक- अलका पत्ताडे, तृतीय क्रमांक- सरिता खांडेकर, चतुर्थ क्रमांक- मनीषा पाटील, पाचवा क्रमांक- पूजा धनवडे यांनी मिळवला. या विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
विद्यामंदिर बनाचीवाडी येथे झालेल्या रानभाजी स्पर्धेत ८० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच सौ. प्राजक्ता पत्ताडे यांनी केले. स्पर्धेमध्ये १३० पेक्षा जास्त रानभाज्या समाविष्ट होत्या. त्यामध्ये मोरशेंडा, टाकळा, कुर्डू, आंबोशी, आघाडा, आळू, माठ, पोकळा, शेवगा, करटोली, टॅटू, कोथ, राजगिरा, चवळी, मेथी, तांदूळ, भारंग आदी भाज्यांचा समावेश होता.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयवंत पताडे, प्रा. संतोष मधाळे, ए. एम. पाटील व सुषमा चावरे यांनी रानभाज्यांचे महत्व सांगितले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. संतोष मधाळे व सुधीर दुरुगडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी स्वप्नील चौगुले, शिवाजी पत्ताडे, नकुशी रेडेकर, उपसरपंच सुनीता पताडे, आनंदा पताडे, सौ. लता एकावडे, प्रसाद एकावडे, प्रणित एकावडे, ऋतुराज एकावडे, वासुदेव दिघे, संभाजी चौगुले, शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी तर आभार सौ. वृषाली एकावडे यांनी मानले.
रानभाजी स्पर्धेत दिपाली वंजारे प्रथम
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
17 %
4.1kmh
0 %
Thu
32
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
28
°

