Homeशैक्षणिक - उद्योग 'गोकुळ’च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला

‘गोकुळ’च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला

कोल्हापूर :
गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्याकडून रक्षाबंधननिमित्त राखी बांधून घेण्याची परंपरा २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी सुरु केली असून त्यांनी व सहकारी संचालकांनी गेली २० वर्ष ती जपलेली आहे. त्यानुसार यंदाही हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.
संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील व संचालक युवराज पाटील यांना राजापूर (ता. शिरोळ) येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले (ता. कराड) येथील श्रीमती वैशाली शिंदे यांनी राखी बांधून ऋणानुबंध जपले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व दीपक पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page