Homeशैक्षणिक - उद्योग रिलायन्सकडून सरकारी तिजोरीत २.१० लाख कोटींची भर

रिलायन्सकडून सरकारी तिजोरीत २.१० लाख कोटींची भर

कोल्हापूर :
देशाचे आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध प्रकारचे कर, लेवी, स्पेक्ट्रम शुल्क आणि अन्य बाबींतून केंद्र सरकारच्या तिजोरीत एकूण २,१०,२६९ कोटी रुपये जमा केले आहेत, असे कंपनीच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ही रक्कम मागील वर्षाच्या १,८६,४४० कोटी रुपयांपेक्षा १२.८% ने अधिक आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे की रिलायन्सने राष्ट्रीय तिजोरीत २ लाख कोटींपेक्षा अधिक योगदान दिले आहे. त्यासोबतच, वित्तीय वर्ष २०२० ते २०२५ या सहा वर्षांत रिलायन्सने एकूण १० लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकारकडे जमा केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालात कंपनीने मागील १० वर्षांचे आर्थिक प्रदर्शनही मांडले आहे. या अहवालानुसार, कंपनीने आपल्या शेअरधारकांना ५ पट अधिक मूल्य दिले आहे. कंपनीचे बाजार भांडवल मागील १० वर्षांत ५ पट वाढून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १७,२५,३७८ कोटी रुपये झाले आहे, जे यापूर्वी ३३८,७०३ कोटी रुपये होते.
कंपनीच्या एकत्रित महसुलातही ३.६५ पट वाढ झाली असून, वार्षिक निव्वळ नफा वित्त वर्ष २०१५-१६ मधील २९,८६१ कोटी रुपयांवरून २.७२ पट वाढून ८१,३०९ कोटी रुपये झाला आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
86 %
5.5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page