कोल्हापूर :
साहित्य विचारांचे वलय निर्माण करत असते. त्यामुळे साहित्य वाचणे, लिहिणे गरजेचे आहे. अनुभवविश्व समृध्द् असेल तर साहित्य चांगल्या प्रकारे लिहिता येते. साहित्य हे नवनवीन उन्मेष धारण करणारे असते. मौनातल्या भावनांना शब्दांत व्यक्त करुन लिहिते व्हा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते प्रा. राजा माळगी यांनी केले.
ते विवेकानंद कॉलेजमधील वाड्.मय मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वाड्मय मंडळ’च्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. यावेळी आयक्युएसी समन्व्यक डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. राजा माळगी म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजामधील अज्ञानाचा अंधकार दूर केला आहे. माणसाला व्यक्त होता आले पाहिजे. मानवाची उत्क्रांती शारीरिक आणि बौध्दिक या दोन पातळ्यांवरती झाली, परंतु मानव बुध्दीचा वापर करेनासा झाला आहे. त्यामुळे डार्विनने सांगितलेल्या उत्क्रांतीच्या सिध्दांताप्रमाणे माणसाचा मेंदू नष्ट होईल. मानवाचा मेंदू आणि मेंदूच्या माध्यमातून निर्माण झालेली भाषा या दोन गोष्टी वगळल्यास माणसाचे मानवीपण संपून जाईल. कोणतीही दुसरी भाषा शिकण्यासाठी मातृभाषा चांगली येणे गरजेचे असते. साहित्यिक होणे सोपे आहे त्यासाठी फक्त शब्दांशी खेळता आले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी, समाजमाध्यामातून येणाऱ्या माहितीची खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथाचे वाचन करणे गरजेचे आहे. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. त्यामुळे वाचनातून समाज जाणीव निर्माण होते. ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक आहे, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रदीप पाटील यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ. दीपक तुपे, डॉ. स्नेहा देसाई, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा. अश्विनी खवळे, प्रा. आर्या कुलकर्णी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————————————-
मौनातल्या भावनांना शब्दात व्यक्त करा : प्रा. राजा माळगी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
24.9
°
28 %
2.6kmh
3 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

