कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेज येथे आयक्यूएसी आणि स्टाफ ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अकॅडेमिक्स अँड एआय’ या विषयावरील व्याख्यान झाले. जेएनयू विद्यापीठातील संशोधक आणि लेखक प्रा. पंकज फणसे यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हेच उद्याचे भविष्य’ असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी एआय च्या वाढत्या प्रभावावर आणि त्याच्या सकारात्मक वापरावर जोर दिला.
प्रा. फणसे यांनी सांगितले की, एआय चा वापर आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. संशोधन क्षेत्रात एआय च्या मदतीने चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत असल्या, तरी त्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत: शिक्षण क्षेत्रात एआय चा वापर हा जबाबदारीने आणि सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि प्राध्यापकांचे अध्यापन अधिक प्रभावी होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते. प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. कविता तिवडे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, स्टाफ ॲकॅडमी समन्वयक प्रा. अविनाश गायकवाड, स्टाफ सेक्रेटरी डॉ. आर. वाय. पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स : उद्याचे भविष्य! – प्रा. पंकज फणसे
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
50 %
2.1kmh
0 %
Thu
26
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
29
°

