Homeसामाजिकडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये टिनिटसग्रस्त रुग्णांसाठी बुधवारी शिबीर

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये टिनिटसग्रस्त रुग्णांसाठी बुधवारी शिबीर

कोल्हापूर :
कानात सतत शिट्टी वाजणे, घंटीसारखा आवाज ऐकू येणे किंवा कोणताही बाह्य आवाज नसताना वेगवेगळ्या ध्वनींचा अनुभव येणे ही समस्या ‘टिनिटस’ म्हणून ओळखली जाते. ही समस्या सामान्य वाटली तरी अनेकदा ती व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारी ठरते. अशा रुग्णांसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बुधवारी (दि.६) कान, नाक आणि घसा विभागातर्फे टिनिटसविषयी मार्गदर्शन व उपचार शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होईल.
टिनिटससाठी निश्चित उपचार नाही. मात्र योग्य मार्गदर्शन आणि उपचार पद्धतीमुळे आराम मिळू शकतो. श्रवणशक्ती कमी असलेल्या लोकांना श्रवणयंत्र वापरल्याने फरक पडू शकतो. काही रुग्णांमध्ये साउंड जनरेटर, मास्कर्स वापरले जातात. टिनिटसच्या या समस्येबाबत सविस्तर मार्गदर्शन, तपासणी आणि उपचार यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये टिनिटसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेता येणार असून, टिनिटसची कारणे, निदान व त्यावरील उपचारपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डी. वाय. पाटील हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
80 %
3.1kmh
100 %
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page