Homeशैक्षणिक - उद्योग आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी संकुलचे संघ तृतीय

आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी संकुलचे संघ तृतीय

कोल्हापूर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी संकुल तळसंदेच्या मुलींच्या व मुलांच्या संघाने तृतीय स्थान मिळविले. कृषी महाविद्यालयाच्या श्रेया श्रीकांत कदम – पाटील हीने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विद्यापीठ संघात स्थान मिळवले आहे.
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ  स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. डी. बनसोड उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या १० जिल्ह्यांमधील २४ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या श्रेया कदम – पाटील हिने स्पर्धेमध्ये सहा गुण मिळवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेत श्रेयासह सानिका बाबासाहेब नलवडे, श्रुती रमेश पवार, श्रद्धा मोहन पाटील, उत्कर्षा अनिल शिंदे तर मुलांच्या संघामध्ये अरविंद मुथूराज, राजेश्वर जाधव, गणेश कुचेकर, श्रीनिवास डांगे, आर्यन कणसे यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज प्रा. पी. डी. उके व प्रा. आर. आर. पाटील तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी संघाचे, खेळाडूंचे व प्रशिक्षक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
80 %
3.9kmh
84 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page