कोल्हापूर :
रसायनिक खते, बी- बियाणे व किटकनाशके यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती करणे शेतकऱ्यांच्यासाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे शेती फायद्यात आणण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी करावा, असे आवाहन कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. महाजन यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कवठेपिरान (ता. मिरज) आयोजित शेतकरी मेळाव्यात डॉ. महाजन बोलत होते. एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. शेलार होते.
डॉ. महाजन म्हणाले, शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्याचा उत्पादन खर्च अधिक होत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे गरजेचे आहे. शेतीमध्ये कंपोस्ट व हिरवळीची खते यांच्यासोबत इतर जैविक खतांचाही वापर करावा. तसेच पिकावर पडलेल्या किडी व रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे.
शेतकरी मेळाव्यामध्ये हळद पिकाच्या विक्रमी उत्पादनाबद्दल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून विशेष पुरस्काराने सन्मानित कृषिभूषण विनोद तोडकर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी हळद पिक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान व विक्रमी हळद उत्पादन घेण्यासाठी उपाययोजना, दक्षता याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी कवठेपिरान गावच्या सरपंच सौ. अनिता माने तसेच कारंदवाडी, मिरजवाडी, तुंग, दूधगांव व समडोळी या सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी व शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी इंजि. वाय. व्ही. पाटील व डॉ. के. एस. शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे कृषीदुत व कृषीकन्या यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा : डॉ. महाजन
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
6.8kmh
100 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°