Homeशैक्षणिक - उद्योग इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उदघाटन

इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उदघाटन

कोल्हापूर :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे इचलकरंजी शहरातील दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात झाले.
याप्रसंगी प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालये स्थापन करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक कौशल्य या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. समाजाला उद्ध्वस्त‍ होण्यापासून वाचविण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणारे विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी या लॉ कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतील आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक विचार आत्मसात करुन सुसंस्कारी वकील, न्यायाधीश निर्माण होतील.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, ॲड. विवेक घाटगे व संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केली.
उदघाटन समारंभास संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे आदी उपस्थित होते.
यावेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या हितेंद्र साळुंखे, ॲड. हितेश राणिंगा, प्राचार्या ॲड. बागडी, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य विरेन भिर्डी, अमित आव्हाड, प्रा. मयुर बोरगे, ॲड. तौफिक नायकवडे, अजित भोसले, प्रा. अजहर दाडीवाले, प्रा. चेतन पाटील, बी. आर. पाटील, रमेश रावण, रिटा रॉड्रिक्स् आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या. आभार संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मानले. तर सुत्रसंचालन प्रा. डॉ. अतिश पाटील यांनी केले.
या उदघाटन सोहळ्यास जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. मनोज पाटील, ॲड. अमित सिंग, ॲड. इंद्रजित चव्हाण तसेच संस्थेचे आजी-माजी आजीव सेवक, पदाधिकारी, विविध शाखांचे शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, इचलकरंजीतील प्रतिष्ठित मान्यवर, छायाचित्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
28 °
83 %
3.1kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page