कोल्हापूर :
कोल्हापूर शहर प्रधान डाकघर आणि इचलकरंजी प्रधान डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरामध्ये तसेच शाखा डाकघरामध्ये दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी APT हे नवीन ॲल्पिकेशन सुरु करण्यात येणार आहे.
ज्याचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस प्रदान करणे हा आहे. जो भविष्यात अधिक स्मार्ट, कार्यक्षम डाकसेवा देण्याचा कटिबध्दतेचा भाग आहे. या प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी दि. २ ऑगस्ट रोजी नियोजित डाउनटाईम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २ ऑगस्टला कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. ही तात्पुरती सेवा स्थगिती डेटा स्थलांतर, प्रणाली पडताळणी आणि संरचना प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन प्रणाली सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु करता येईल.
ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे आणि या तात्पुरत्या अडथळ्यात सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
——————————————————-
नवीन प्रणालीमुळे पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार २ ऑगस्टला बंद
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°