कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या ६४ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर टेकमहिंद्रामध्ये प्रोजेक्ट ट्रेनी पदावर १९ विद्यार्थ्यांची तर अपमोसीस टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेनी, फंक्शनल इंजिनिअर पदावर १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
हेक्सावेअर ही शंभर टक्के तंत्रज्ञान आधारित, ग्लोबल आयटी सेवा व बीपीओ कंपनी आहे. ती एआय, क्लाउड, ऑटोमेशनवर भर देऊन विविध उद्योगांसाठी डिजिटल परिवर्तन सुलभ करते. १९९० मध्ये नवी मुंबई येथे सुरू झालेल्या या कंपनीचा जगातील अनेक देशांमध्ये विस्तार आहे. नवी मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, नोएडा येथे कार्यालये असून जगभरात ३० हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
या कंपनीच्यावतीने महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विविध चाळण्यामधून ६४ विद्यार्थ्यांची कंपनीकडून निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या ३०, एआयएमएलच्या १२, डाटा सायन्सच्या १७, इलेक्ट्रोनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर टेकमहिंद्रामध्ये प्रोजेक्ट ट्रेनी पदावर १९ विद्यार्थ्यानी तर अपमोसीस टेक्नोलॉजीस प्रा. लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेनी, फंक्शनल इंजिनिअर पदावर १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
याबाबत कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले की, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयाकडून कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेतले जात आहेत. या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६४ विद्यार्थ्यांची हेक्सावेअरमध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
8.2kmh
17 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°