Homeकला - क्रीडासम्राट, केदार व राजवीर राज्य ज्युनियर फुटबॉल संघातून राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

सम्राट, केदार व राजवीर राज्य ज्युनियर फुटबॉल संघातून राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

कोल्हापूर :
सम्राट मोरबाळे, केदार सोनाळे व राजवीर गुरव यांची महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॉईज फुटबॉल संघा निवड झाली आहे. केएसएचे हे खेळाडू पंजाब येथील अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातून राज्याचे व कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने ज्युनियर बॉईज राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद डॉ.बी.सी.रॉय ट्रॉफी टीयर-१, पंजाबमधील अमृतसर येथे दि. २० ते ३० जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॉईज फुटबॉल संघाचा समावेश आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने या फुटबॉल संघातील खेळाडूंचे नांवे नुकतीच जाहीर केली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)चे सम्राट कृष्णात मोरबाळे (महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर), केदार संग्राम सोनाळे (महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर) व राजवीर सुजित गुरव (क्रीडाप्रबोधिनी) यांची निवड झालेली आहे.
केएसए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षक प्रदीप साळोखे, गजानन मनगुतकर व संतोष पोवार यांनी प्रशिक्षण शिबिरात केएसए जिल्हा संघातील खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन करून या खेळाडूंची निवड केलेली होती.
या खेळाडूंना केएसएचे पेट्रन-इन् चीफ् श्री शाहू छत्रपती महाराज, पेट्रन् मेंबर श्री संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसए अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या आणि वे.इं.फु.असो. महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉ. जनरल सेक्रेटरी प्रा. अमर सासने, ऑन. फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व केएसए फुटबॉल समिती सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page