• राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निवेदन
कोल्हापूर :
संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळावर कायमस्वरूपी अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे, चर्मकार समाजासाठी असलेल्या रविदास चर्मोद्योग महामंडळाकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक निधी उपलब्ध करून देण्यात यावा यांसह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे खासदार धनंजय महाडिक, खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांना देण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरोजताई बिसुरे तसेच प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने दि. ५ जुलै २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्या बैठकीत, प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना आणि जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्याचे ठरले. त्यासंदर्भाने कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दिपक खांडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष बिसुरे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मनिषा डोईफोडे, सौ. आरती कामटे, सौ. स्वाती नांगरे, रणजीत नांगरे, निलेश हंकारे, अजित चव्हाण, राम कारंडे, गणेश नांगरे, अनिल सुर्यवंशी आणि चर्मकार समाजबांधव उपस्थित होते
चर्मोद्योग महामंडळाला निधी देण्याची मागणी
Mumbai
overcast clouds
27.6
°
C
27.6
°
27.6
°
78 %
3.7kmh
99 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°