कोल्हापूर :
येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने कळंबा येथील शेतामध्ये ‘किसान दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी किसान दिन साजरा केला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आधुनिक तसेच पारंपरिक शेतीविषयक माहिती दिली.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजऱ्या होणाऱ्या किसान दिनाचे औचित्य साधून विवेकानंद महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने हा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील बी.एस्सी. भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी कळंबा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीतील विविध अडचणी, हवामान बदलाचा परिणाम, उत्पादन खर्च, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच बाजारपेठेतील समस्या याबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशी वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन, कमी खर्चात अधिक उत्पादन, तसेच पर्यावरणपूरक शेती पद्धती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. देशी बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित अन्ननिर्मिती होते, याबाबत चर्चा झाली. शेतकरी व विद्यार्थ्यांमधील हा संवाद दोन्ही घटकांसाठी उपयुक्त ठरला.
हा उपक्रम विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात तसेच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. भाऊराव दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अभिजीत कासारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
विवेकानंद महाविद्यालयात किसान दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7
°
C
24.7
°
24.7
°
49 %
2.8kmh
0 %
Mon
27
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

