• सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीचा आज अंतिम सामना
कोल्हापूर :
सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झारखंड आणि हरियाणा संघ आमनेसामने आले आहेत. गुरुवारी (दि.१८) या दोन्ही संघात विजेतेपदासाठी लढत होत आहे. गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची आणि रोमांचक लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्यावतीने बुधवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंतिम फेरीत पोहोचलेल्या झारखंड संघाचा कर्णधार ईशान किशन आणि हरियाणा संघाचा कर्णधार अंकित कुमार उपस्थित होते.
यावेळी झारखंडचा कर्णधार ईशान किशन म्हणाला की, झारखंड संघ पहिल्यांदाच सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला असून त्यामुळे संघात आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्ही सकारात्मक आणि आक्रमक मानसिकतेने क्रिकेट खेळत आलो आहोत. समोरचा हरियाणा संघही उत्तम क्रिकेट खेळत आहे. टी-२० प्रकारात तुम्ही कोणत्या मानसिकतेने खेळता हे अत्यंत महत्त्वाचे असते. आम्ही प्रत्येक सामन्याला विजयाच्या मानसिकतेनेच मैदानात उतरतो. अंतिम सामन्यासाठीही आमचा दृष्टिकोन साधा असेल. या खेळपट्टीवर काय गरजेचे आहे, त्यानुसार आम्ही आमचे नियोजन करू आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू.
हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार म्हणाला की, स्पर्धेच्या सुरुवातीला आमचे तीन पैकी दोन सामने पराभवात गेले होते. त्यामुळे त्यानंतरचे सर्व सामने आमच्यासाठी नॉकआउट स्वरूपाचे होते. पॉवर प्लेमध्ये कमीत कमी विकेट गमावणे आणि डावाच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमक खेळ करणे, हा आमचा मुख्य दृष्टिकोन राहिला आहे. सुपर लीगच्या शेवटच्या सामन्यातही हैदराबादविरुद्ध आम्ही याच मानसिकतेने खेळलो, ज्याचा फायदा आम्हाला चांगली धावसंख्या उभारण्यात झाला. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भावना अतिशय समाधानकारक आहे.
अंकित कुमार पुढे म्हणाला की, झारखंड संघाकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू असून त्यांची टॉप ऑर्डर सातत्याने धावा करत आहे. आमच्या संघातही अष्टपैलू खेळाडू असून टॉप ऑर्डर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे दोन्ही संघ संतुलित आहेत. आम्ही अंतिम सामन्यात सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरणार आहोत.
——————————
झारखंड आणि हरियाणा संघात जेतेपदासाठी लढत
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
0 %
Thu
27
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°

