• २७ हजारांहून अधिक नागरिकांना दिले सुरक्षित डिजिटल बँकिंगविषयी शिक्षण
कोल्हापूर :
एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेतर्फे त्यांच्या डिजिटल बँकिंग जागरुकता मोहिमचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतात सायबर गुन्हेगारी विषयी जागरुकता कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. एप्रिल २०२५ पासून बँकेतर्फे ४००० कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून २७००० नागरिकांना सुरक्षित डिजिटल बँकिंगविषयी शिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळांच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थी, वरिष्ठ नागरीक, स्वयंसहायता गट, ग्राहक आणि कर्मचार्यांना शिक्षण देण्यात येते. या संभाषणात्मक अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी लोकांना सुरक्षित डिजिटल बँकिंगच्या पध्दतींसह कशाप्रकारे सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याच्या पध्दतीं विषयी माहिती देण्यात आली. या कार्यशाळांमध्ये खरी उदाहरणे, गोष्टी आणि व्हिडिओजच्या माध्यमातून सहभागी लोकांना गुन्हेगारांची कार्यपध्दती आणि त्यांच्यापासून बचाव करण्याच्या टिप्स सुध्दा देण्यात आल्या. यातील काही कार्यशाळांचे आयोजन हे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज (एलईएज)च्या सहकार्याने करण्यात आले होते.
यावेळी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट इंटेलिजन्स ॲन्ड कंट्रोल्सचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, गुन्हेगार नेहमीच सोशल इंजिनियरींग पध्दतींचा अवलंब करण्यासह तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांची दिशाभूल करुन त्यांचे शोषण करण्यासाठी करत असतात. म्हणूनच नागरिकांमध्ये ते वापरत असलेल्या गुन्हेगारी पध्दतीची माहिती करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरुन ते बँकिंग विषयीची गोपनीय माहिती देणार नाहीत किंवा माहिती नसलेल्या लिंक्सवर क्लिक करणार नाहीत. या कार्यशाळांचा मुख्य उद्देश हा की सहभागी लोकांना शिक्षण देऊन सुरक्षित बँकिंग विषयी माहिती देऊन त्यांना जागरुक करणे जेणेकरुन ते अशा ऑनलाईन गुन्ह्याचे शिकार होणार नाहीत. नेहमी थोडं थांबा, विचार करा आणि कोणतेही काम करण्यापूर्वी ते तपासून पहा.
बँक ग्राहकांना डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित बँकिंग सवयींचा अवलंब करण्याचे आणि त्यांची गोपनीय बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करण्याचे टाळण्याचे प्रोत्साहन देते. जर ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले तर त्यांनी ताबडतोब बँकेला अनधिकृत व्यवहारांची तक्रार करावी आणि भविष्यातील नुकसानापासून बचाव करण्यासाठी पेमेंट मोड ब्लॉक करावा. ग्राहकांनी गृह मंत्रालयाने (एमएचए) ने सुरू केलेल्या १९३० हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करावी आणि राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करावी.
—————————— ————————-

——————————
|
|