HomeUncategorizedब्युटी क्षेत्रात करिअरच्या अमर्याद वाटा : सोनल मुळे

ब्युटी क्षेत्रात करिअरच्या अमर्याद वाटा : सोनल मुळे

कोल्हापूर :
ब्युटी आणि मेकअप क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य कौशल्य, सर्जनशीलता आणि सातत्याने शिकण्याची तयारी महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली तर या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व ब्युटीशियन व सातारा येथील लिसेंट सलून मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या संचालिका सौ. सोनल मुळे यांनी केले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या तज्ज्ञ वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. यावेळी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रीतेश मुळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, ब्युटी पार्लर कोर्सच्या समन्वयक प्रा. दीपाली पाटील व डॉ. संदीप वाटेगावकर उपस्थित होते.
यावेळी सौ. सोनल मुळे पुढे म्हणाल्या की, आजच्या काळात विद्यार्थ्याने स्वतःचे कौशल्य मार्केटमध्ये ब्रँड कसा होईल यावर लक्ष केंद्रित करावे. सतत नवीन ट्रेंड जाणून घेणे आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार स्वतःला अपडेट ठेवणे हेच यशाचे खरे रहस्य आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, आज विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावहारिक कौशल्य आत्मसात केले, तर रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध आहेत. महाविद्यालयात विविध कौशल्य विकास उपक्रम राबवले जात आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे एखादे कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे. ब्युटी आणि मेकअपसारख्या क्षेत्रात तरुणाईला मोठा वाव असून, विद्यार्थ्यांनी शिकलेल्या कौशल्याचे उद्योजकतेत रूपांतर करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या प्रचंड संधी आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्युटी पार्लर कोर्सचे समन्वयक डॉ. संदीप वाटेगावकर यांनी केले. मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंका विचारल्या. प्रा. दीपाली पाटील यांनी आभार मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
51 %
3.6kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page