कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे समन्वयक प्रा. महेश सुर्याजीराव साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.
प्रा. महेश साळुंखे हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी गजाननराव उर्फ एस. पी. साळुंखे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी “in – Elastic Seismic Design of Reinforced Concrete Structures Using Rapid Plastic Method” या विषयावर आपला प्रबंध सादर केला आहे. या प्रबंधाचे मार्गदर्शन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील अप्लाइड मेकॅनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. एन. तंडे यांनी केले आहे.
प्रा. साळुंखे यांच्या संशोधनातील निष्कर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांच्या संशोधनामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भूकंपरोधक रचनांच्या डिझाईनविषयी नवे दृष्टीकोन उपलब्ध झाले आहेत. ते पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, एमआयडीसी, म्हाडा, पोलिस हाऊसिंग इत्यादी शासकीय विभागांसाठी स्ट्रक्चरल, थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिटर, आरसीसी डिझाईन व प्रूफ चेकिंग कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, अधिविभागाचे संचालक तसेच डॉ. के. टी. कृष्णास्वामी व डॉ. ए. बी. कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभले.
प्रा. महेश साळुंखे यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.
——————————————————-
प्रा. महेश साळुंखे यांना पीएच.डी.
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

