HomeUncategorizedप्रा. अनिल शिंदेपाटील यांची जागतिक विक्रमात नोंद

प्रा. अनिल शिंदेपाटील यांची जागतिक विक्रमात नोंद

• ७० तासांत ७० कलाकारांनी साकारली शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी
कोल्हापूर :
रोहा, रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलचे कला विभागप्रमुख प्रा. अनिल जयवंत शिंदेपाटील व त्यांच्या टीमने साकारलेल्या भव्य रांगोळीची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व युनायटेड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
सव्वा लाख चौ. फुट एवढ्या प्रचंड क्षेत्रफळावर अवघ्या ७० तासांत ७० कलाकारांनी ही रांगोळी साकारून इतिहास घडवला. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य दर्शन या रांगोळीतून घडवून छत्रपती शिवरायांच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देण्यात आला.
या विक्रमी रांगोळीची दखल घेऊन दोन्ही आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमी संस्थांनी प्रा. अनिल शिंदेपाटील यांना मानाचा बहुमान दिला आहे. रोहा येथे घडविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे शिवप्रेमींचा अभिमान उंचावला असून, जागतिक स्तरावर शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली स्मृतीला उजाळा मिळाला आहे. संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, स्कुलच्या संचलिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी अनिल शिंदे यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
47 %
0kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page