कोल्हापूर :
व्हिएतनाम येथे झालेल्या सातव्या आशिया युवा शिखर परिषदेत डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटीमध्ये
१ ते ४ फेब्रुवारी दरम्यान ‘कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे जागतिक परिवर्तन : तंत्रज्ञान, शिक्षण आणि व्यक्ती यांची सांगड’ या विषयावर सातवी आशिया युवा शिखर परिषद उत्साहात पार पडली. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतातून केवळ तीन प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये शोएब घोडीमार याचा समावेश होता.
आशिया खंडातील विविध देशांतील युवा प्रतिनिधी, विद्यार्थी, संशोधक, उद्योजक आणि शैक्षणिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शिक्षण, उद्योग, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकास क्षेत्रात जागतिक स्तरावर परिवर्तन कसे घडवून आणता येईल, यावर सखोल व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि सादरीकरणे घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी युवकांना नवकल्पना, नेतृत्वगुण, जागतिक सहकार्य आणि शाश्वत विकास याबाबत मार्गदर्शन केले.
या परिषदेत शोएब घोडीमार याने ‘ह्युम्यानिटी सेंटर्ड ए आय’ हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाची प्रभावी मांडणी आणि सामाजिक उपयुक्तता याची दखल घेऊन ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. या परिषदेकरिता संस्थेमार्फत त्यांना अंशतः आर्थिक सहाय्य देण्यात आले होते.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. उमेश पाटील आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शोएब तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी शोएब घोडीमार यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
62 %
2.1kmh
67 %
Fri
27
°
Sat
28
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°

