कोल्हापूर :
द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएल फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय टी-२० क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत अंतिम फेरीत संजोय दरवडा (४९ धावा), गणेश भुसारा (४४ धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीसह माझी भरत (२४ धावा व १-३०) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गुजरात संघाने कर्नाटक संघाचा २० धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने २० षटकात ६ बाद १९८ धावांचे आव्हान उभे केले. यात संजोय दरवडाने २७ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ४९ धावा, गणेश भुसार ४४ धावा, माझी भरत २४ धावा, अनिल गरिया २० धावा, हितेश पटेल नाबाद १४ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटक संघ २० षटकात ५ बाद १७८ धावा करू शकला. यात प्रभु हलियालने ५२ चेंडूत १० चौकारासह ७५ धावा तर रंगा एन. ने ४२ चेंडूत ७ चौकारासह ६४ धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. गुजरात संघाकडून रामभाई पारे (२-२३), मनीष हडीया (१-४४) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला २० धावांनी विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या गुजरात संघाला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरणप्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजीत बडे, पीबीएमएचे अध्यक्ष राजेश शहा, पीबीएमएच्या एच. व्ही. देसाई, आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, बीसीएचे अध्यक्ष रवी वाघ, माजी रणजीपटू मिलिंद गुंजाळ आणि एचसीएलफाऊंडेशनच्या सहयोगी संचालिका सिमी सुरी, एचसीएलटेकच्या क्लायंट डिलिव्हरी विभागाचे संचालक जनक लालन आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————
राष्ट्रीय टी-२० क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत गुजरात संघाला विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
62 %
2.1kmh
67 %
Fri
27
°
Sat
28
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°

