कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम विभागातील जियो प्लॅटफॉर्म्सने आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत (Q3) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जियोचा EBITDA वार्षिक आधारावर 16.4% वाढून ₹19,303 कोटींवर पोहोचला असून, निव्वळ नफा 11.2% वाढून ₹7,629 कोटी झाला आहे. या तिमाहीत जियोने 89 लाख नवीन ग्राहक जोडले असून, डिसेंबर 2025 अखेर कंपनीचा एकूण ग्राहकवर्ग 51 कोटी 53 लाखांवर पोहोचला आहे. प्रति ग्राहक प्रतिमाह डेटा वापर 40.7 GB इतका राहिला, तर एकूण डेटा ट्रॅफिक वार्षिक आधारावर 34% वाढून 62.3 अब्ज GB झाला आहे.
जियोच्या कामगिरीवर भाष्य करताना रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले, जियोने जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवून भारताच्या डिजिटल क्रांतीला नवी गती दिली आहे. 500 दशलक्षांहून अधिक ग्राहक, सखोल ग्राहक-अंतर्दृष्टी आणि पॅन-इंडिया नेटवर्कच्या बळावर जियो भारताला केवळ AI-सक्षमच नव्हे, तर AI-सशक्त बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येत्या काळात यामुळे सर्व स्टेकहोल्डर्ससाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती होईल.
उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 2026 च्या पहिल्या सहामाहीत जियोचा IPO आणण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. जियोच्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीमुळे कंपनीच्या यशस्वी लिस्टिंगबाबतच्या अपेक्षा अधिक बळकट झाल्या आहेत. निकालांनुसार, जियोचे 5G ग्राहक आता 25 कोटी 30 लाखांच्या पुढे गेले असून, एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिकमध्ये 5Gचा वाटा सुमारे 53% झाला आहे.
ब्रॉडबँड आणि AIसह डिजिटल इकोसिस्टममध्येही कंपनीने मोठी झेप घेतली आहे. फिक्स्ड ब्रॉडबँडशी जोडलेली एकूण घरे व आस्थापना 2 कोटी 53 लाखांपर्यंत वाढली असून, जियो एअरफायबरचा ग्राहकवर्ग 1 कोटी 15 लाखांच्या पुढे पोहोचला आहे. त्याचबरोबर, जियो AI क्लाउडच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या सुमारे 5 कोटींवर पोहोचली आहे.
——————————
जियोची दमदार वृद्धी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
23
°
C
23
°
23
°
73 %
1.5kmh
5 %
Sun
24
°
Mon
24
°
Tue
25
°
Wed
26
°
Thu
25
°

