Homeकला - क्रीडा२०३६ ऑलिंपिक हे भारताचे स्वप्न : नीता अंबानी

२०३६ ऑलिंपिक हे भारताचे स्वप्न : नीता अंबानी

रिलायन्स फाऊंडेशनला ‘बेस्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स – हाय परफॉर्मन्स’ पुरस्कार
कोल्हापूर :
FICCI च्या १५व्या ग्लोबल स्पोर्ट्स समिट ‘TURF 2025’ आणि ‘इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025’मध्ये रिलायन्स फाऊंडेशनला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
नीता अंबानी यांनी हा पुरस्कार रिलायन्स फाऊंडेशन परिवाराला आणि देशातील तरुण खेळाडूंना समर्पित केला. पुरस्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या की, येणारे दशक भारतीय क्रीडाजगताचे सुवर्ण दशक ठरणार आहे. भारताला जागतिक मल्टी-स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्याची ही योग्य वेळ आहे. २०३६ ऑलिंपिक गेम्सचे आयोजन करणे हे १.४ अब्ज भारतीयांचे सामूहिक स्वप्न आहे, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन कटिबद्ध आहे.
रिलायन्स फाऊंडेशनला ‘बेस्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स – हाय परफॉर्मन्स’ हा पुरस्कार प्रदान करताना FICCI ने म्हटले आहे की, हा पुरस्कार फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता एम. अंबानी यांना त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांसाठी आणि नेतृत्वासाठी दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत सदस्य होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांनी जागतिक ऑलिंपिक चळवळीला बळकटी देण्यात आणि भारताच्या क्रीडा आकांक्षा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने तळागाळातील उपक्रमांपासून ते एलिट अ‍ॅथलीट विकासापर्यंत अनेक परिवर्तनकारी कार्यक्रम राबवले आहेत.
नीता अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स फाऊंडेशनच्या क्रीडा उपक्रमांनी देशभरातील २ कोटी ३० लाखांहून अधिक युवकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. शालेय स्तर, तळागाळातील क्रीडा, किंवा उच्च-प्रदर्शन प्रशिक्षण केंद्र—प्रत्येक ठिकाणी युवकांना क्रीडेशी जोडण्यात आले आहे. आपला युवा जिंकतो तेव्हा संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावते, असे त्या म्हणाल्या.
महिला खेळाडूंच्या वाढत्या कामगिरीबद्दल बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, क्रीडेमध्ये जीवन बदलण्याची, समाजाला एकत्र आणण्याची आणि देशाला ऊर्जा देण्याची अद्भुत शक्ती आहे. भारताची क्रीडा-भावना गावोगावीच्या मैदानांपासून ते जागतिक व्यासपीठांपर्यंत चेतवली जात आहे. आपल्या मुली सातत्याने तिरंगा गौरवान्वित करत आहेत. आमच्या मुली जेव्हा खेळतात, तेव्हा प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला जिंकते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
54 %
3.6kmh
1 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page