कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला सोमवारी (दि.२४) प्रारंभ होत आहे. येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर) यांच्यामार्फत प्रतिवर्षीप्रमाणे २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विशालगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी दिली.
ते म्हणाले की, या मोहिमेत बारा राज्यातील एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या चार तुकड्या असणार आहेत. त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या राहणार आहेत. प्रत्येक तुकडीत २६० विद्यार्थी सहभागी असणार आहेत. या विद्यार्थ्यांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी. तो कालखंड अनुभवता यावा. राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, तत्कालीन कालखंडात सैन्यदलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती एनसीसीच्या विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने ही मोहिम आखण्यात आली आहे.
या मोहिमला अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र संचालनालय, राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) अर्थात एडीजी – मेजर जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खासदार शाहू छत्रपती महाराज हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेमुळे राज्यातील विविध सहभागी एनसीसी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसेच ऐतिहासिक कालखंडाची ओळख निर्माण होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वासही श्री. पैठणकर यांनी व्यक्त केला.
यावेळी कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिम सोमवारपासून
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
54 %
3.6kmh
1 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

