कोल्हापूर :
कुमुद गयावळ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सांगली चॅम्प्स संघाने बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
भाऊराव पाटील क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीने ४० षटकांत ८ बाद १९७ धावा केल्या. यामध्ये साक्षी डांगे ४० धावा, समृद्धी गुंडाळ ३६ धावा, सायली मोहिते २४ धावा, नमन खाडे ३० धावा व पियु शहाणे १८ धावा केल्या. सांगली चॅम्प्सकडून कृषी ठक्करने ३ बळी घेतले. सई येवलुजकर २ बळी, स्नेहल टकले, अर्पिता नायकवडी व भावी पूनमिया यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
प्रत्युत्तर दाखल खेळताना सांगली चॅम्प्सने २५.३ षटकांमध्ये ४ गडी बाद १९८ धावा केल्या. यामध्ये कृषी ठक्कर ३७ धावा, अनुश्री ९३ धावा, सरस्वती कोकरे २६ धावा केल्या. बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीकडून श्रीवर्धिनी गुंडाळ २ बळी, आदिती साळुंखे व प्राची कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीची संजना वाघमोडे, बेस्ट ब्याटर व प्लेयर ऑफ द मॅच सांगली चॅम्प्सची कर्णधार कृषी ठक्कर, बेस्ट बॉलर बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीची साक्षी डांगे यांनी किताब पटकावले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ कॅलेक्स स्पोर्ट्स अकॅडमीचे अशोक पाटील, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य वैभव पाटील यांचे हस्ते झाला. याप्रसंगी मयूर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष केदार गयावळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सांगली चॅम्प्सने पटकावला कुमुद गयावळ चषक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
64 %
2.1kmh
7 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

