Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी. वाय. पाटील बी.टेक ॲग्रीचा वर्धापन दिन उत्साहात

डॉ. डी. वाय. पाटील बी.टेक ॲग्रीचा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर :
तळसंदे येथील  डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा (बी.टेक ॲग्री.) २३वा वर्धापन दिन सोमवारी (दि.१०) उत्साहात संपन्न झाला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तसेच डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व सर्वोत्तम ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या या महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळ्याचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या गेल्या २३ वर्षांच्या गौरवशाली प्रवास, शैक्षणिक प्रगती, संशोधन कार्य आणि विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा प्रेरणादायी व्हिडिओ दाखवण्यात आला. यानंतर केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, डी. वाय. पाटील संस्थेचा पाया हा गुणवत्ता, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित आहे. महाविद्यालयातून घडलेले शेकडो कृषी अभियंते आज देशाचे कृषी क्षेत्र, संशोधन, बँकिंग, प्रशासन अशा विविध माध्यमातून देश विकासात योगदान देत आहेत. हे महाविद्यालय भविष्यात शाश्वत कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी ताकदीने योगदान देईल. विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी विचारसरणी अंगीकारून ग्रामीण विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. एस. बी. पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि संशोधनात्मक कार्याचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी उपप्राचार्य इंजि. पी. डी. उके याचा ‘बेस्ट टीचर’ म्हणून गौरव करण्यात आला. तसेच ५ महिन्यांच्या  इंप्लांट ट्रेनिंग कालावधीत फार्मट्रॅक या ट्रॅक्टर कंपनीतून सर्वाधिक २ लाख ४३ हजारांचे विद्यावेतन घेणारा संकेत जाधव आणि ९१ हजार रुपयांचे विद्यावेतन घेणारा निरंजन सोनके, यंदाचा कृषिथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळवणारा  युवराज परीट आणि जपान येथून १ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या तेजस्विनी उपाध्ये यांचा गौरव करण्यात आला.
सुत्रसंचालन प्रा. एस. बी. माळी यांनी केले. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर, हेड फार्म ऑपरेशन्स इंजि. ए. बी. गाताडे, डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, डी. वाय. पाटील कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य इंजि. पी. डी. उके, कॅम्पस इंजिनियर विश्वनाथ पाटील, सीनियर ऑफिस सुप्रीटेंडेंट आर. पी. शिंदे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
57 %
2.1kmh
0 %
Mon
24 °
Tue
27 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page